नाशिक | दि. ७ जुलै २०२६: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नांदुरी ते सप्तशृंगीगड हा घाट रस्ता ७ ते ९ जुलैदरम्यान पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी दिले आहेत. तसेच दुगारवाडी व पहिने या पर्यटनस्थळांवर सुमारे २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, या कालावधीत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठीही प्रवेश बंद राहणार आहे.
प्रशासनाने श्री सप्तशृंगीगड परिसरातील सर्व धबधबे, धबधबा परिसर, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ, पर्यटनस्थळे तसेच पूरप्रवण धार्मिक स्थळांवर नागरिकांच्या प्रवेशास मनाई केली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सप्तशृंगीगड ते नांदुरी हा डोंगराळ घाटमार्ग असून येथे तीव्र वळणे, चढ-उतार आहेत. मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, झाडे पडणे किंवा इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
![]()


