आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे भेट- यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना

नाशिक। दि. ७ जुलै २०२६: भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात 7 जुलै रोजी ढगफुटीची शक्यता वर्तविली आहेत. यानुसार प्रशासनाने सतर्क राहून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

त्यानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे आज रात्रीच मुंबई येथून नाशिकला रवाना झाले. मंत्री महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिककडे येत असतानाच अतिवृष्टी होणाऱ्या इगतपूरी त्र्यंबकेश्वर भागाचा दौरा केला. तसेच ज्या भागामध्ये पाणी साचणार आहे तेथील पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत असलेल्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मध्ये विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनांचा आढावा घेतला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भद्रकाली मंदिरातील सिंहाची मूर्ती चोरीला; तासाभरात दोघे ताब्यात

अतिवृष्टीचे संभाव्य धोके लक्षात घेऊन काही नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात येत आहे त्याबाबत देखील माहिती मंत्री महाजन यांनी जाणून घेतली. इगतपुरी मध्ये मुंबई नाशिक महामार्गावर कुठेही पाणी साचणार नाही वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांची देखील पाहणी मंत्री महाजन यांनी केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आईला २५ हजार देतो’ म्हणत तरुणीला जाळ्यात ओढले; बनावट लग्नातून २ लाख उकळले

इगतपुरी येथे तहसीलदार अभिजीत बारवकर, नगरपरिषदेचे मुख्य कार्य अधिकारी, नगराध्यक्ष व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. स्वामी यांच्यासोबत परिसराला भेट देऊन पाहणी केली. तसेच आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेस दिल्या. यावेळी तहसीलदार गणेश जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790