नाशिक। दि. ३ जुलै २०२६: नाशिक शहरामधील मखमालबाद उपकेंद्र अंतर्गत असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठ ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच द्वारका १ कक्ष अंतर्गत सारडा व गोदावरी वाहिनी वर असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने अंडरपास रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यांच्या महत्वाच्या कामानिमित्त या दोन्ही भागातील वीज पुरवठा शनिवारी ४ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
त्याचप्रमाणे नाशिक शहरामधील नाशिक शहर २ विभाग मधील द्वारका कक्ष २ अंतर्गत १३२ केव्ही टाकळी उपकेंद्र येथे महत्त्वाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी ४ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पुढील भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे:
आरोग्य विज्ञान विद्यापीठ ११ केव्ही विद्युत वाहिनीवरील बंद राहणाऱ्या भागामध्ये मखमलाबाद गाव, स्वामी विवेकानंद नगर, इरिगेशन कॉलनी, तिडके नगर, गावरान हॉटेल, नमन हॉटेल, शांती नगर, कंसारा चौफुली, ओंकार नगर, चाणक्य पुरी, राऊ हॉटेल, चांदवडकर नगर, तवली फाटा, मेघराज बेकरी, भगवान बाबा नगर, शंकर नगर, राम नगर, सावंत पेट्रोल पम्प, शिंदे मळा, मुंगसरा शिवार, मातोरी शिवार व परिसर यांचा समावेश आहे.
तसेच सारडा व गोदावरी वाहिनीवरील असलेल्या १२ विद्युत रोहीत्रावरील वीज पुरवठा बंद असणार आहे या मध्ये बागवान पुरा, द्वारका सर्कल, वडाळा नाका, कपूर मार्केट, मोठा राजवाडा, चौक मंडई, चित्रकूट, कावेरी हॉटेल एरिया, बेले लेन, रेणुका नगर, आझाद चौक व परिसर यांचा समावेश असेल.
सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पुढील भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे:
परिसरातील उत्तरा नगर, शंकर नगर, काठे गल्ली, बोधले नगर पखाल रोड, सारडा सर्कल परिसर, तपोवन रोड, टाकळी रोड, टाकळी गाव, भाभा नगर, वडाळा नाका, अशोका मार्ग, रविशंकर मार्ग, टाकळी औद्योगिक वसाहत, रॉयल कॉलनी, सह्याद्री सिग्नल परिसर, जनरल वैद्य नगर व परिसर यांचा समावेश आहे.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ व २ यांच्याकडून करण्यात आले आहे.
![]()


