नाशिक: सीसीटीव्हीचे ‘डीव्हीआर’ चोरणाऱ्या टोळीला अटक; १९ डीव्हीआरसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. ४ जुलै २०२६: शहरातील विविध सोसायट्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणेचे ‘डीव्हीआर’ (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) चोरून सुरक्षा व्यवस्थेलाच धोका निर्माण करणाऱ्या दोन संशयितांना पंचवटी गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत विविध कंपन्यांचे १९ डीव्हीआर, गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोपेड आणि इतर मिळून सुमारे ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता पंचवटीतील हनुमानवाडी परिसरातील ‘एकदंत हाइट्स’ सोसायटीमधून अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर चोरून नेला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास वेगाने करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भद्रकाली मंदिरातील सिंहाची मूर्ती चोरीला; तासाभरात दोघे ताब्यात

तपासादरम्यान पोलिस अंमलदार कैलास शिंदे यांना दोन जण चोरीचे डीव्हीआर विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने हनुमानवाडी-चोपडा लॉन्स रस्त्यावरील कोशिरे मळा परिसरात सापळा रचून समीर अयूब शहा (वय २५) आणि आसीम नूर खान (वय २३, दोघे रा. मेहबूबनगर, वडाळागाव) यांना ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या...

संशयितांकडून एमएच १५ केएल ९८८२ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मोपेड तसेच विविध कंपन्यांचे १९ डीव्हीआर पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत संशयितांनी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790