नाशिक: विधान परिषद निवडणूक २०२६: स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात दुपारी 12 वाजेपर्यंत 9.85 टक्के मतदान

नाशिक। दि. १८ जून २०२६: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत 9.85 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  'आधुनिक युगातील सावित्री -पत्नीच्या अवयवदानातून पतीला नवजीवन' - अपोलो हॉस्पिटल, नाशिक येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण !

नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील एकूण नऊ मतदान केंद्रांवर आज सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६१९ मतदारांपैकी ६१ उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदान केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर यांनी आज सकाळी नाशिक तहसील कार्यालय, चांदवड तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांना भेट देत पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790