नाशिक: शहरातील या महत्वाच्या वाहतूक मार्गात आज (दि. ११) बदल

नाशिक। दि. ११ जून २०२६: कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभ शिलान्यास आणि गंगापूजन सोहळा गुरुवारी (दि. ११) रामकुंडावर होणार आहे. यानिमित्त रामकुंड आणि जुने भाजी पटांगण परिसरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने पहाटे ५ वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत या भागात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि जगद्‌गुरू श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत सोहळा पार पडणार आहे. याशिवाय गोदाघाटावरील जुने भाजी पटांगण येथे महाराजांचे प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. रोकडोबा व कपुरथला मैदानात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

पायी जाण्यासाठी पर्यायी मार्ग:
रविवार कारंजा, एकमुखी दत्त मंदिर येथून गांधी तलावाकडे जाणारा मार्ग.
सरकारवाडा, सराफ बाजार, भांडीबाजार, पांडे मिठाईमार्गे रामसेतूकडून डावीकडे यशवंत महाराज पटांगण व उजवीकडे कपुरथळा मैदानाकडे.
ट्रॅक्टर हाऊस, नानावली, अमरधाम, शितलादेवी मंदिर ते रोकडोबा मैदान
नेहरू चौक, दिल्ली दरवाजा ते रोकडोबा मैदान.
गाडगे महाराज पुतळा, साक्षी गणपती मंदिर, बुधा हलवाई, तिवंधा चौक ते रोकडोबा मैदान.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790