नाशिक जिल्ह्यात नीट 2026 परीक्षा केंद्रांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

नाशिक। दि. ७ जून २०२६: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली मार्फत घेण्यात येणारी नीट यूजी (NEET-UG 2026) परीक्षा नाशिक जिल्ह्यातील विविध केंद्रांवर 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उपकेंद्रनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कळविले आहे.

परीक्षा केंद्रांवरील सर्व प्रशासकीय व्यवस्था, उमेदवारांना आवश्यक सुविधा तसेच परीक्षा प्रक्रियेचे प्रभावी समन्वयन करण्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच नेमून दिलेल्या उपकेंद्रांना परीक्षेच्या दिनांकापूर्वी तसेच परीक्षेच्या दिवशी केंद्रांना भेट देऊन NEET-UG 2026 परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

नोडल अधिकारी असे:
हेमांगी पाटील (अपर जिल्हाधिकारी, नाशिक):
१) के.आर.टी. आर्ट्स, बी.एच. कॉमर्स आणि ए.एम. सायन्स कॉलेज, नाशिक (केटीएचएम ब्लॉक ए), २) के.आर.टी. आर्ट्स, बी.एच. कॉमर्स आणि ए.एम. सायन्स कॉलेज, नाशिक (केटीएचएम ब्लॉक बी), ३) एच.पी.टी. आर्ट्स अँड आर.वाय.के. सायन्स कॉलेज, कॉलेज रोड, नाशिक, ४) मराठा हायस्कूल, गंगापूर रोड (ब्लॉक ए), ५) मराठा हायस्कूल, गंगापूर रोड (ब्लॉक बी), ६) डी.डी. बिटको बॉईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाशिक.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

देवदत्त केकाण (अपर जिल्हाधिकारी, मालेगाव):
१) महाराजा सयाजीराव गायकवाड कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मालेगाव कॅम्प, २) एटीटी हायस्कूल आणि महाविद्यालय, मालेगाव, ३) एचजीव्हीएस महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालय, मालेगाव कॅम्प.

रोहितकुमार राजपूत (निवासी उपजिल्हाधिकारी):
१) लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पंचवटी, नाशिक, २) सी.डी.ओ. मेरी हायस्कूल, मेरी, पंचवटी, नाशिक, ३) श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, सातपूर, नाशिक, ४) यूथ नॅशनल हायस्कूल फॉर गर्ल्स, सारडा सर्कल, नाशिक, ५) पीएम श्री केंद्रीय विद्यालय, एएफसी, ओझर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

कुंदन हिरे (उपजिल्हाधिकारी, प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक):
१) पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक १, नाशिक रोड कॅम्प, आर्टिलरी सेंटर, नाशिक, २) पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक १, देवळाली, ३) पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक २, आयएसपी, नाशिक रोड, नाशिक, ४) शासकीय पॉलिटेक्निक, सामनगाव रोड, नाशिक, ५) श्रीमती विमलाबेन कुमार तेजूकाया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळाली कॅम्प, नाशिक, ६) आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स आणि एन.एस.सी. सायन्स कॉलेज, नाशिक रोड, नाशिक, ७) पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिक रोड, नाशिक.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790