रेल्वेचा 6 जूनला मेगा ब्लॉक; पंचवटी व इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

नाशिक। दि. ५ जून २०२६: कसारा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आटगाव येथे इंटरलॉकिंगच्या कामामुळे बुधवार दि. ६ जून रोजी मुंबई व भुसावळ रेल्वे विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई – भुसावळ दरम्यान धावणाऱ्या काही प्रमुख गाड्या ६ जून रोजी रद्द, तर काहींचे मार्ग वळवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने मुंबई – मनमाड धुळे व धुळे – मनमाड – मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मनमाड – मुंबई व मुंबई – मनमाड पंचवटी एक्स्प्रेस या जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या ६ जूनला रद्द करण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 'वन प्लॅटफॉर्म' यंत्रणा; गर्दी, वाहतूक अन् सुरक्षेचे होणार 'रिअल टाइम' व्यवस्थापन

६ गाड्यांच्या मार्गात बदल: मुंबई बल्लारशाह नंदीग्राम एक्स्प्रेस, दादर साईनगर शिर्डी, मुंबई -लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेस, कुर्ला- बलिया कामायनी एक्स्प्रेस, दादर – गोरखपूर समर एक्स्प्रेस आणि पनवेल – गोरखपूर – पनवेल एक्स्प्रेस या गाड्या दि. ६ जून रोजी कल्याण – कसारा-इगतपुरी-नाशिकरोड-मनमाड ऐवजी कल्याण-कर्जत-लोणावळा – पुणे – अहिल्यानगर कोपरगाव – मनमाड मार्गे धावतील. हिंगोली –मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी मुंबई ऐवजी नाशिक रोडपर्यंत धावेल व तेथूनच ती परतेल. नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस ही गाडी मुंबई ऐवजी मनमाडपर्यंत धावेल व तेथूनच परतेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' महत्वाच्या वाहतूक मार्गात दोन दिवस (दि. ५ आणि ६ जून) महत्वाचे बदल…

११ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल: हावडा मेल मुंबईहून १० तास उशिराने सुटेल, तर हावडा – मुंबई मेल ३.१५ तास उशिराने, कुर्ला – शालिमार ३.२० तास, कुर्ला – बनारस ३.२० तास, कुर्ला – पाटलीपुत्र २.२५ तास, मुंबई – गोरखपूर हॉलिडे एक्सप्रेस ५.३० तास आणि मुंबई – अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेस २.३० तास मुंबई येथून उशिराने सुटतील. दि. ७जून रोजी मुंबई येथून सुटणारी कुर्ला – गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस कुर्ला येथून १.५५ तास, मुंबई -नागपूर हॉलिडे एक्स्प्रेस २ तास, तर मुंबई – बनारस महानगरी एक्स्प्रेस २ तास विलंबाने सुटणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790