नाशिक: अन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत १ लाख २० हजार रुपयांचा संशयित अन्नपदार्थ साठा जप्त

नाशिक। दि. २९ मे २०२६: नागरिकांना दर्जेदार व सकस अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशानाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. 27 मे 2026 रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या तपासणीत आढलेलेल्या संशायस्पद अन्न पदार्थांचा रूपये 1 लाख 19 हजार 712 साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त दि.ज्ञा. तांबोळी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

जेलरोड, नाशिकरोड येथील मे. अजनी ट्रेडर्स या पेढीची तपासणी केली असता पेढी विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. या पेढीत विक्रीसाठी आढळलेले Cafenated Beverage (Sting) व एनर्जी ड्रिंक या दोन अन्न पदार्थांचे नमुने घेवून उर्वरित रूपय 31 हजार 680 किंमतीचे 1 हजार 584 बाटल्या भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

पंचवटी, मार्केट यार्ड या ठिकाणी मे. नेहा फुड प्रॉडक्टस् या पेढीच्या तपासणीतही विनापरवाना विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पेढीत विक्रीसाठी मैदा पापड व स्नॅक्स या दोन अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित रूपये 13 हजार 568 किंमतीचा 336 किलोग्रॅम साठा भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे

मे.बालाजी ट्रेडिंग कंपनी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या पेढीच्या तपासणीत या पेढीत विक्रीसाठी असेलेले रिफाइंड सोयाबीन ऑइल हे खुल्‍या स्वरूपात विक्री होत असल्याचे आढळले, या तेलाचे नमुने तपासणीसाठी घेवून रूपये 68 हजार 864 किंमतीचा 430 किलोग्रॅमचा साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथे मे. गुरूदत्त छाया डेअरी या पेढीच्या तपासणीत पेढीत अनारोग्य परिस्थितीत पनीर या अन्न पदार्थाचे उत्पादन व विक्री होत असल्याचे निदर्शनास आले अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित रूपये 3 हजार 200 किंमतीचा 10 किलोग्रॅम साठा भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

मे.स्वामी बेव्हरेजस, माळेगाव, सिन्नर या पेढीत विक्रीसाठी आढळलेले स्वीटेन्ड कॉरबॉन्टेड बिव्हरेजेस या अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेवून रूपये 2 हजार 400 किंमतीच्या बाटल्या भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनामार्फत जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

27 मे 2026 रोजी जिल्ह्यात केलेल्या तपासणीत घेण्यात आलेले अन्न नमुने विश्लेषणासाठी संबंधित अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त श्री. तांबोळी यांनी कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन, अन्न व सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशान्वये अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, संकेत येलमामे, गोविंदा गायकवाड, प्रतिक भड, सुहास मंडलिक, संदीप तोरणे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप, संदीप देवरे, दिनेश तांबोळी यांच्या उपस्थितीत व सह आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात तक्रार तसेच गोपनीय माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790