नाशिक शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. ३०) वीजपुरवठा बंद राहणार…

नाशिक। दि. २९ मे २०२६: महापारेषणच्या १३२/३३ के.व्ही. टाकळी अति उच्चदाब विद्युत उपकेंद्र येथे देखभाल व दुरुस्तीचे काम व विद्युत रोहित्र स्थलांतर करण्यात येणार आहे.

त्यामुळे नाशिक शहर विभाग १ व २ अंतर्गत येणाऱ्या टाकळी, मेरी, गणेशवाडी पंपिंग आणि उपनगर या विद्युत उपकेंद्र व त्यावरील ११ केव्ही विद्युत वाहिन्यांचा वीजपुरवठा शनिवार ३० मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

वीजपुरवठा बंद असणारे भाग:
👉 उत्तरा नगर वाहिनीवरील उत्तरा नगर, मेट्रो मॉल परिसर, ड्रीम सिटी परिसर, अशोका मार्ग, रविशंकर मार्ग, सुयोग नगर, बोधले नगर, तपोवन रोड, गणेश बाबा नगर, आदित्य नगर, वृंदावन नगर.

👉 टाकळी वाहिनीवरील टाकळी गाव, अनुसया नगर, तपोवन रोड, मारुती वेफर्स परिसर व जय शंकर लॉन परिसर

👉 शंकर नगर वाहिनीवरील शंकर नगर, काठे गल्ली, माणेकशा नगर, बुऱ्हानी सोसायटी, त्रिकोणी गार्डन, टाकळी रोड व परिसर

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

👉 गोदावरी वाहिनीवरील गोदावरी परिसर, सारडा सर्कल, जुने नाशिक, ट्रॅक्टर हाऊस, नानावली, कठडा, टिकापुरी , गाडगेबाबा मठ, बुधवार पेठ, पाटील गल्ली, भंगार वाडी, काजीपुर, मुलतान पुरा , कोकणी पुरा, बेळ गल्ली ,स्टार लाइन, वॉटर ग्रेस, अमरधाम, काजी बिल्डिंग, मोदकेश्वर, मानवता हॉस्पिटल, कोर्टयार्ड व परिसर

👉 सारडा सर्कल मधील झाकीर हुसेन हॉस्पिटल, शिवनेरी झोपडपट्टी, डॉ. आंबेडकर गार्डन, द्वारका सर्कल, महात्मा फुले पुतळा, बागवान पुरा, बुरुड गल्ली, आझाद चौक, राजवाडा चौक मंडई, कावेरी हॉटेल, महालक्ष्मी चाळ, गोदावरी हॉटेल, निरंजन गॅरेज, नागसेन वाडी, आझाद नगर, वाणी हाऊस व परिसर या भागाचा समावेश असणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790