नाशिक: देशी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक; गुन्हे शाखा युनिट-१ ची मध्यरात्री कारवाई

नाशिक। दि. २३ मे २०२६ : शहरात बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून अटक केली. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार विलास चारोस्कर आणि आप्पा पानवळ यांना संशयित राहुल दिलीप जाधव (वय २७, रा. राजीव नगर, गंगापूर) हा ध्रुवनगर परिसरात देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तसेच तो परिसरात दहशत पसरवत असल्याचेही समोर आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयत्याने हल्ला, तोडफोड करणाऱ्या बेहनवाल टोळीचा केला ''कायद्याचा बालेकिल्ला'' !

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ध्रुवनगर येथील गुलमोहर कॉलनीमागील पाटाजवळ सापळा रचला. २२ मे रोजी मध्यरात्री सुमारे १२:५५ वाजण्याच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान आरोपीकडून विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ शस्त्रसाठा जप्त करत आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवत यांच्या मार्गदर्शनाखाली महेश साळुंखे, प्रदीप म्हसदे, धनंजय शिंदे, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, विलास चारोस्कर, राम बडे आणि गोरक्ष साबळे यांच्या पथकाने पार पाडली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790