नाशिक: शहरातील ‘या’ भागातील वीजपुरवठा शनिवारी (दि. २३) बंद राहणार

नाशिक। दि. २२ मे २०२६: महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही टाकळी उपकेंद्राच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने नाशिक शहर विभाग २ च्या द्वारका उपविभाग अंतर्गत असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा (शनिवारी) २३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ११ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

त्याचप्रमाणे: ११ के.व्ही. कलानगर फीडर वर विद्युत पुरवठा वीज वाहिन्या देखभाल व दुरुस्तीसाठी काम करण्यात येणार असल्याने शनिवारी दिनांक 23 मे २०२६ रोजी सकाळी 09:30 ते दुपारी 03:30 वाजेपर्यंत पुढील भागातील वीजपुरवठा बंद राहील.

यामध्ये खालील परिसराचा समावेश असेल.
उत्तरा नगर, शंकर नगर, काठे गल्ली, पखाल रोड, सारडा सर्कल परिसर, तपोवन रोड, टाकळी रोड, टाकळी गाव आणि अशोका मार्ग व परिसर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य वर्षा पर्यटनासाठी तात्पुरते बंद; भूस्खलन, झाडे कोसळल्याने निर्णय

तसेच भागांतील सुद्धा वीजपुरवठा बंद राहणार:
रामेश्वर नगर, शिवगंगा नगर, निसर्ग नगर, कलानगर, पोखार कॉलनी, रिलायन्स पेट्रोल पंप परिसर, पोलिस हेडकॉर्टर, देशमुख चौक आडगाव रोड परिसर, फॉरेस्ट डेपो, वरवंडी रोड परिसर, म्हसरूळ आडगाव लिंक रोड परिसर, म्हाडा कॉलनी परिसरातील वीजपुरवठा खंडित राहील.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790