भारतीय वायुसेनेच्या बीआरडी, नाशिककडून भारतीय नौदलाच्या मिग-29 के इजेक्शन सीटचे स्वदेशी ओव्हरहॉल यशस्वी

नाशिक। दि. १५ मे २०२६: आत्मनिर्भरता आणि त्रि-सेवा समन्वय (Jointness) अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भारतीय वायुसेनेच्या बेस रिपेअर डेपो (बीआरडी), नाशिक यांनी भारतीय नौदलाच्या मिग-29के लढाऊ विमानाच्या पहिल्या इजेक्शन सीटचे स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी ओव्हरहॉल पूर्ण केले आहे. यापूर्वी भारतीय नौदलाच्या मिग-29 के विमानांच्या इजेक्शन सीट्स ओव्हरहॉलसाठी रशियाला पाठविण्यात येत होते.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

ओव्हरहॉल करण्यात आलेली इजेक्शन सीट 13 मे 2026 रोजी नाशिक येथे आयोजित समारंभात भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडचे एओसी-इन-सी एअर मार्शल यल्ला उमेश, व्हीएसएम, पीएचडी तसेच भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस अ‍ॅडमिरल राहुल विलास गोखले, वायएसएम, एनएम उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

बीआरडी, नाशिक येथे मिग-29 तसेच सुखोई-30 एमकेआय विमानांचे आणि त्यांच्या विविध एग्रीगेट्सचे मेजर ओव्हरहॉल करण्यात येते. कालांतराने या डेपोने या दोन्ही विमान ताफ्यांच्या जटिल देखभाल आवश्यकतांसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य, सक्षम दुरुस्ती क्षमता आणि विशेषीकृत पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. सुखोई-30 एमकेआयच्या इजेक्शन सीट ओव्हरहॉलमधील अनुभवाचा उपयोग करून बीआरडीने भारतीय नौदलाच्या मिग-29 के इजेक्शन सीटसाठी आवश्यक ओव्हरहॉल तंत्रज्ञान विकसित केले असून त्यास वायुयोग्यता प्रमाणन संस्था आरसीएमएची मान्यता प्राप्त झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

ही यशस्वीता भारतीय वायुसेनेची स्वदेशी देखभाल क्षमता अधिक मजबूत करण्याच्या आणि परदेशी सहाय्यावर अवलंबित्व कमी करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे भारतीय वायुसेनेच्या बीआरडी, नाशिककडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790