नाशिक: भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नामकर्ण आवारे अटकेत

नाशिक। दि. १३ मे २०२६: नाशिक जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई करत शिवनिका संस्थानचे माजी सचिव तसेच जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला यांना अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, खरातच्या चौकशीत आवारे याचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

तपासादरम्यान सिन्नर येथील जगदंबा माता पतसंस्थेत अशोक खरातच्या नावाने उघडण्यात आलेल्या तब्बल 32 खात्यांना नामकर्ण आवारे यानी सहमती दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याच आधारे पोलिसांनी पुढील कारवाई केली. अशोक खरातला सिन्नर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार आवारे यांच्यावरही गुन्ह्यात सहभागाचा संशय बळावल्याने त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, नामकर्ण आवारे ‘असा मी नामकर्ण’ या पुस्तकातील अशोक खरातविषयीच्या गौरवपर लिखाणामुळेही चर्चेत आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

जगदंबा माता पतसंस्थेत बनावट खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अशोक खरातला आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. गैरव्यवहारातील पैशांचा स्रोत आणि व्यवहारांचे जाळे उघड करण्यासाठी अधिक चौकशीची गरज असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढविण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत खरातला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

याचवेळी, महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातविरोधातील तपास एसआयटीकडून अधिक तीव्र करण्यात आला आहे. तपासाचा भाग म्हणून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची गेल्या आठवड्यात तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. प्रकरणातील विविध पैलूंची माहिती घेण्यासाठी त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला असून, या चौकशीनंतर तपासाला अधिक वेग मिळाल्याचे मानले जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790