नाशिक: शहरातील ‘या’ तीन नवीन मार्गांवर सोमवारपासून सिटी लिंक बससेवा सुरु होणार

नाशिक। दि. २६ एप्रिल २०२६: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि वाढत्या प्रवासी संख्येची गरज ओळखून नाशिक महानगर परिवहन महामंडळातर्फे (सिटी लिंक) सोमवारपासून (दि. २७) तीन नवीन मार्गांवर बस सोडण्यात येणार आहेत. तपोवन ते अमृतानगर, नाशिकरोड ते मखमलाबाद आणि नाशिकरोड ते बारदान फाटा अशा तीन मार्गांवर या बसेस धावतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

दर अर्ध्या तासानंतर मखमलाबादसाठी बस:
मार्ग क्रमांक ११४:
नाशिकरोड ते मखमलाबाद (थांबे जेलरोड, नारायण बापूनगर, निलीगिरी बाग, हनुमाननगर, आरटीओ कॉर्नर, म्हसरूळ). अप आणि डाऊन अशा एकूण ३० बसफेऱ्या. दर अर्ध्या तासाने बस. सकाळी ६.५० वाजता तपोवन येथून तर सकाळी ८.५० वाजता नाशिकरोड येथून या मार्गावरील फेरीला सुरुवात होईल.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

सातपूरसह पाथर्डी फाट्यासाठी ४८ फेऱ्या:
मार्ग क्रमांक २१९: नाशिकरोड ते बारदान फाटा (थांबे : वडनेर, पाथर्डी फाटा, एक्सलो पॉईंट, सातपूर). एकूण ४८ फेऱ्या (२४ जाणाऱ्या आणि २४ येणाऱ्या). दर अर्ध्या तासाने बस. सकाळी ६ वाजता नाशिकरोड डेपोतून बस सुटेल. यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

महामार्गावर प्रत्येक प्रत्येक १५ मिनिटांनी बससेवा:
मार्ग १०६ जी:
तपोवन ते अमृतानगर (थांबे : पंचवटी, महामार्ग, लेखानगर, गामणे गार्डन, कृष्णाईनगर, सावंत चौक). एकूण ५६ फेऱ्या. दर १५ मिनिटांनी बससेवा. पहाटे ५.४५ वाजेपासून तपोवन येथून या मार्गावरील बस सुटेल. विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी ही बससेवा महत्त्वाची ठरणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790