Amazon

नाशिक: चाकूचा धाक दाखवून रिक्षाचालकाला लुटले

नाशिक। दि. २६ एप्रिल २०२६: शहरातील द्वारका सर्कल परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षाचालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना समोर आली आहे. तिघा अज्ञात तरुणांनी मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

या संदर्भात शहबाज अरीफ शेख (वय २७, रा. पखाल रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास शेख हे द्वारका सर्कलजवळील धुळे मार्गावरील महामार्गावर रिक्षा उभी करून प्रवाशांची प्रतीक्षा करत होते. त्यावेळी ते मोबाईल पाहत असताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून (एमएच १५ केएफ ४४०७) तिघे तरुण तेथे आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

संशयितांनी अचानक शेख यांच्या हातातील मोबाईल खेचून घेतला. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या खिशातील १,०२० रुपयांची रोकडही बळजबरीने काढून घेतली. घटनेनंतर तिघेही आरोपी दुचाकीवरून पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790