गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त आयोजन

मुंबई/नाशिक। दि. १५ एप्रिल २०२६: “गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी २५ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा , जलसंपदा लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी महाराष्ट्रात असून त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राशी जोडलेला आहे. अहिल्यादेवींच्या कार्यातील सुशासन, महिला नेतृत्व, लोककल्याण, जलदृष्टी , वारसा संवर्धन यासाठी राष्ट्रीय मूल्ये महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाकडून त्याचे स्मरण करताना हा उपक्रम या जलयात्रेच्या निमित्ताने राबविला जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

25 एप्रिल 2026 रोजी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा शुभारंभ होईल आणि या यात्रांचा संगम शिर्डी येथे होणार असून तेथून छत्रपती संभाजी नगर घृष्णेश्वर, धुळे या मार्गाने इंदूर येथे 29 एप्रिल रोजी समारोप होईल. या जलयात्रेदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम जलयात्रेच्या मार्गावरील गावांमध्ये आणि शहरात होणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790