ग्रेट व्हाइट पेलिकन (रोजी पेलिकनचे) नांदूर मध्यमेश्वरमध्ये आगमन; महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातिल, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य सध्या एका दुर्मिळ पक्षी दर्शनामुळे चर्चेत आले आहे. आपल्या परतीच्या प्रवासात (Return Migration) असलेल्या ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ किंवा ‘रोजी पेलिकन’ या पक्ष्यांचे दर्शन पहिल्यांदा झाले आहे.

नांदूर मध्यमेश्वरच्या नोंदींनुसार, यापूर्वी हा पक्षी २००४-०५ मधे बघितला गेला होता त्यानंतर बऱ्याच वर्षापासून दिसलेला नाही, किंबहुना महाराष्ट्रात देखील अतिशय दुर्मीळ अशा या पक्ष्यांचे दर्शन झाल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे. दि. २८ मार्च २०२६ ला या राजबिंड्या पक्ष्यांनी अधिकृतपणे हजेरी लावल्याने निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासात त्यांनी या रामसर स्थळाची निवड करणे, हे या परिसंस्थेच्या आरोग्याचे शुभसंकेत मानले जात आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

‘रोजी पेलिकन’ का म्हणतात?:
या पक्ष्याला ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ असे नाव असले तरी, विणीच्या हंगामात किंवा विशिष्ट प्रकाशझोतात त्यांच्या पांढऱ्याशुभ्र पिसांवर एक नाजूक गुलाबी (Rosy) छटा उमटते. यामुळेच त्यांना ‘रोजी पेलिकन’ असेही म्हटले जाते. हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला उत्तर गोलार्धातून दक्षिण दिशेला स्थलांतर करतात. आता मार्च महिन्याच्या शेवटी, उन्हाची चाहूल लागताच ते पुन्हा आपल्या मूळ स्थानी (युरोप आणि मध्य आशिया) परतत आहेत. या प्रवासादरम्यान विश्रांती घेण्यासाठी आणि अन्नाचा साठा करण्यासाठी त्यांनी नांदूर मध्यमेश्वरच्या अभयारण्याची निवड केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

वैशिष्ट्ये आणि महत्त्व:
शाल पंख: पेलिकन हे जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहेत. त्यांचा पंखांचा विस्तार खूप मोठा असतो, जो लांबच्या प्रवासासाठी त्यांना मदत करतो.

“जलाशयातील माशांची मुबलक उपलब्धता आणि पानवेली व टायफा यांचे उच्चाटन करून योग्य अधिवास निर्मिती हे या पक्ष्यांच्या आगमनाचे मुख्य कारण आहे.”– कृष्णा भवर (उपवनसंरक्षक, वन्यजीव नाशिक)

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

“या पक्ष्यांचे आगमन हे दर्शवते की, अधिवास जपल्यास आणि आवश्यक व्यवस्थापन केल्यास दुर्मिळ पक्षी येऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.– हेमंत उबाळे ( सहाय्यक वनसंरक्षक, नांदूरमध्यमेश्वर)

“नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यासाठी आणि पक्षीप्रेमींसाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक घटना आहे. ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ (Great White Pelican), या पाहुण्यांचे आगमन झाले आहे या पाहुण्याचे आम्ही आतुरतेने स्वागत केले आहे”.
-हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव नाशिक.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790