नाशिक। दि. १८ मार्च २०२६: गुढीपाडवा बारा गाड्या समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) भवानी माता यात्रा उत्सव आणि बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर सातपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने कोंडीची समस्या निर्माण होऊ नये याकरिता दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत त्र्यंबकरोडवरील वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
प्रवेश बंद मार्ग: सकाळ सर्कल, व्हिक्टर चौक, सातपूरगाव कमान ते महिंद्रा सर्कल, या मार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुकीस प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग: या मार्गावरील वाहतूक सर्कल, अचानक चौक, पंढरीनाथ गांगुर्डे मार्गाने महावितरण कार्यालय, नाशिक ऑक्सिजन कंपनी, बॉश कंपनी, महिंद्रा सर्कल, पापया नर्सरी मार्गाने दुहेरी वाहतूक येण्या-जाण्यासाठी वळवण्यात आली आहे.
![]()

