नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२६: सिंहस्थ पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या गोदातिरी ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा आणि सायंकाळी महागोदाआरती होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून साधू मंहत, अतिमहत्वाच्या व्यक्ती व व्हीव्हीआयपी आणि हजारो भाविक रामतीर्थावर दाखल होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान नागरिकांची गैरसोय टळावी याकरिता वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
🚫 हे मार्ग राहणार बंद:
👉 अशोकस्तंभ ते पंचवटी परिसर-अशोकस्तंभ, रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, इंद्रकुंड, पंचवटी कारंजा ते दिंडोरीनाका.
👉 गोदाघाटाकडे जाणारे रस्ते:
मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टॅण्ड, कपालेश्वर मंदिर, सरदार चौक, गौरी पटांगणाकडे जाणारे मार्ग.
👉 पूल व इतर मार्ग- रामसेतू पूल, गाडगे महाराज पूल, शनि चौकाकडून रामकुंडाकडे येणारे रस्ते, तसेच खांदवे सभागृह, मालवीया चौक ते पंचवटी कारंजा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील.
👉 घाट परिसर- एकमुखी दत्त मंदिर, गांधी तलाव, यशवंत महाराज पटागंण, रोकडोबा मैदान परिसर हा सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांच्या हालचालींसाठी मर्यादीत ठेवण्यात आला आहे.
हे पर्यायी मार्ग वापरा:
👉 दिंडोरी नाका ते गंगापूर नाका– पेठनाका सिग्नल, मखमलाबाद नाका, गोदा पार्क, गजभिये पेट्रोल पंप, चोपडा लॉन्स, गंगापूर नाका.
👉 सीबीएस ते अमृतधाम – सीबीएस, मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, जुना गंगापूरनाका, ड्रीम कॅसल, फडोळ चौक, कृषी सिग्नल, तारवाला सिग्नल, अमृतधाम चौक.
👉 पेठ नाका ते मिर्ची चौक- पेठनाका, कृबा समिती सिग्नल, तरवाला सिग्नल, अमृतधाम चौक, मिर्ची चौक.
👉 जुना गंगापूर नाका- कॅनडा कॉर्नर, टिळवाडी सिग्नलमार्गे सीबीएस अथवा शरणपूर सिग्नलमार्गे मायको सर्कल या मार्गांचा वापर करावा.
![]()


