नाशिकच्या ‘कॅप्टन’ ज्योतिषाला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक; सखोल चौकशीची मागणी

नाशिक, दि. १८ मार्च २०२६ : स्वत:ला ज्योतिषी म्हणवणाऱ्या करणाऱ्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात नाशिक गुन्हे शाखा युनिट-१ ने अटक केली आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून बुधवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करत खरात याला ताब्यात घेतले. पहाटे सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

पोलिस तपासादरम्यान संशयिताकडून काही व्हिडिओ मिळाल्याची माहिती समोर येत असून, त्यांची सखोल तपासणी सुरू आहे. या व्हिडिओंमधून आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790