नाशिक: महसूल विषयक समस्या तात्काळ सोडविण्यासाठी समाधान शिबिरे प्रभावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक। दि. १५ मार्च २०२६: सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या तत्काळ सोडवून शासनाच्या सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात येणारी समाधान शिबिरे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

सोनांबे (ता. सिन्नर) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आज आयोजित शिबिरात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ रामकुमार, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व नगारिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्य शासनामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान ” राबविण्यात येत आहे. यासोबतच महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत जलद व सुलभ पद्धतीने पोहोचाव्यात हा शासनाचा उद्देश आहे. समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातच विविध महसूल सेवा उपलब्ध होत असून त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यास मदत होत आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

🔎 हे वाचलं का?:  एप्रिलमध्येच उष्णतेचा कडाका; राज्यात तापमानाचे उच्चांक, ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट

सोनांबे येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 मध्ये विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्या उपस्थितीत खालील प्रमाणे सेवा प्रदान करण्यात आल्या

महसूल विभाग

  • शासन निर्णयानुसार भोगवटदार वर्ग २ मधून वर्ग १ साठी प्राप्त 7/12 – 1
  • जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत इतर अधिकारातून कब्जेदार सादरी घेतलेले 7/12 – 4
  • कलम 155 दुरुस्ती अर्ज – 5
  • वारस नोंदी – 31
  • मोहिमेअंतर्गत चूक दुरुस्ती झालेल्या फेरफार – 13
  • नियमित प्रलंबित फेरफार निर्गत – 29
    सामाजिक अर्थसहाय्य योजना
  • दाखल झालेले प्रस्ताव – 8
  • प्राप्त अर्ज – 20
  • मोहिमेअंतर्गत Agristack मान्यता – 42
  • नवीन Agristack नोंदणी – 3
  • पीएम किसान योजनेचे नवीन नोंदणी – 6
    शिक्षण विभाग
  • विविध शालेय दाखले वाटप – 48
  • शालेय दाखल्यांसाठी प्राप्त अर्ज – 85
    पुरवठा विभाग
    •रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट – 15
  • रेशन कार्डमधून नाव कमी – 5
  • दुय्यम वितरित केलेले रेशन कार्ड – 7
    महिला व बालविकास / आरोग्य विभाग
  • आयसीडीएस योजनेंतर्गत बेबी किट वाटप – 2
  • आयुष्मान कार्ड – 22
  • मातृ वंदना योजना अर्ज – 21
  • आरोग्य कॅम्पमध्ये सिकलसेल तपासणी – 20
    ग्रामविकास विभाग
  • आठ-अ दाखले – 9
  • विवाह नोंदणी दाखले – 7
  • जन्म दाखले – 11
  • मृत्यू दाखले – 4
    इतर
  • पोट खराब क्षेत्र लागवडीयोग्य करण्याबाबत प्रकरणे – 13
🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हा बँकिंग रोडमॅप: सर्वसमावेशक विकासासाठी १० धोरणात्मक स्तंभ

या समाधान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. महसूल प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या त्यांच्या परिसरातच सोडविण्यास मोठी मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

काल जिल्ह्यातील खालील तालुके व महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

  • इगतपुरी – टाके बुद्रुक
  • कळवण – मोकभणगी
  • चांदवड – दुगांव
  • त्र्यंबकेश्वर – हरसूल
  • दिंडोरी – रामशेज, उमराळे बुद्रुक
  • देवळा – लोहोणेर
  • नांदगाव – जातेगाव
  • नाशिक (ग्रामीण) – गिरणारे
  • निफाड – पालखेड, रानवड
  • पेठ – वखारपाडा, जोगमोडी
  • बागलाण – विरगाव , डांगसौंदाणे
  • मालेगाव (ग्रामीण) – सौंदाणे
  • येवला – राजापूर, नगरसूल
  • सिन्नर – सोनांबे
  • सुरगाणा – सावरदरा
  • अप्पर नाशिक – देवळाली (विहितगाव)
  • अप्पर मालेगाव – उर्दूघर

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790