नाशिक: जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त 15 मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक। दि. १३ मार्च २०२६: दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम जिल्हा व तालुका स्तरावर आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यावर्षासाठी शासनाकडून ‘डिजिटल न्यायाच्या माध्यमातून प्रकरणांचा कार्यक्षम व जलद निपटारा’ (‘Efficient and Speedy disposal through Digital justice’) ही संकल्पना जागतिक ग्राहक हक्क दिनासाठी निश्चित करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये संततधार पाऊस, गंगापूर धरणातून ३,०९९ क्यूसेक विसर्ग

त्यानुसार जिल्हा स्तरावरील जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे रविवार 15 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे अवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790