नाशिक: कार भाड्याने घेऊन परस्पर विक्री; दोन संशयित अंबड गुन्हे शाखेच्या जाळ्यात

नाशिक। दि. १३ मार्च २०२६: कार भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या दोन संशयितांना अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रमोद पाटील (रा. कामटवाडा) आणि हेमंत उर्फ गणेश गोसावी (रा. काठे गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी दीड वर्षापूर्वी सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जनगणना 2027 स्वगणनेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध गुन्ह्यांतील फरार संशयितांचा शोध घेत असताना पथकातील पोलिस कर्मचारी मोतीलाल पाटील यांना संशयित कामटवाडा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रमोद पाटील याला ताब्यात घेतले, तर हेमंत उर्फ गणेश गोसावी याला गणेशवाडी परिसरातून अटक करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  एप्रिलमध्येच उष्णतेचा कडाका; राज्यात तापमानाचे उच्चांक, ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट

दोन्ही संशयित मागील दीड वर्षांपासून फरार होते. उपनगर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या लुटीच्या गुन्ह्यातही ते पोलिसांना हवे होते. चौकशीत संशयित वाहनमालकांकडून भाडेकरारावर वाहने घेऊन ती परस्पर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षिरसागर, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, पोअं. भगवान जाधव, चारूदत्त निकम व मपोअं. सविता कदम नेम. गुन्हे शाखा अंबड युनिट-३ यांनी केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790