नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 18 मार्च रोजी आयोजन

नाशिक। दि. १२ मार्च २०२६: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्‍ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्‍ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक या ठिकाणी बुधवार 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थापूर्वी निर्माल्य व्यवस्थापनासाठी मंदिर संस्थानांना एकत्र आणणार कुंभमेळा प्राधिकरण

जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

मेळाव्याच्या दिवशी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या/ नियोक्ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात २० जूननंतर मान्सूनची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता

अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. रिसे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790