नाशिक: बाबाज थिएटर्सतर्फे आज (दि. ६) ‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ मैफल !

नाशिक। दि. ०६ फेब्रुवारी २०२६: गानसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त बाबाज थिएटर्स आयोजित आणि राजा पाटेकर प्रस्तुत “मेरी आवाज पहचान है” हा दीदींच्या आठवणी जागवणारा विशेष संगीत कार्यक्रम शुक्रवार, दि. ६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता प. सा. नाट्यमंदिर येथे रसिकांसाठी सादर होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे नाशिक येथे 16 एप्रिल रोजी आयोजन

प्रशांत जुन्नरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात लतादीदींना अत्यंत प्रिय असलेली तसेच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अजरामर गीते सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमात आघाडीच्या सुप्रसिद्ध गायिका सौ. उषा पाटेकर आपल्या सुमधुर व भावस्पर्शी गायनातून लतादीदींच्या स्वरयात्रेला उजाळा देणार आहेत. त्यांना इंद्रायणी पटणी व जयंत पाटेकर यांचे सुरेल सहगायन लाभणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. १४) महत्वाचे बदल…

वादनाची प्रभावी साथ किशोर पाटेकर, बाबा सोनवणे, देवानंद पाटील, राजन अग्रवाल, अजय गायकवाड आणि हेमंत बुरसे हे कलाकार करणार असून, लतादीदींच्या आठवणींना उजाळा देणारे निवेदन प्रवीण पोतदार सादर करणार आहेत.

हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे लतादीदींच्या संगीतसाधनेचा, त्यांच्या आठवणींचा आणि त्यांच्या अमर आवाजाचा हृद्य भावांजली ठरणार असून, संगीतप्रेमी रसिकांसाठी लतादीदींच्या आवाजाशी पुन्हा एकदा नातं जुळवण्याची ही एक अविस्मरणीय संधी आहे. नाशिककर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशांत जुन्नरे, राजा पाटेकर व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790