नाशिक: स्वयंम योजना व आधार योजनेसाठी अर्ज करण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

नाशिक। दि. ५ फेब्रुवारी २०२६: इतर मागास बहुजन कल्याण विभागंतर्गत शासकीय वसतिगृह पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यास 15 फेब्रुवारीपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचे अर्ज https://hmas.mahait.org या संकेस्थळावर विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नाशिकचे सहायक संचालक संतोष चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

या योजनेंतर्गत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 12 वी नंतर बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले, पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतलेले पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

विद्यार्थांनी अर्ज ऑनलाईन सादर करणे बंधनकारक असून ऑफलाईन अर्ज कार्यालयात सादर करू नयेत, असेही सहाय्यक संचालक श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790