नाशिक। दि. ३ फेब्रुवारी २०२६: मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शारीरिक प्रशिक्षण निदेशक (महिला) 1 पद महाराष्ट्र राज्य सैनिक महामंडळ यांच्यामार्फत भरण्यात येणार आहे.
पात्र उमदेवारांची शनिवार 14 फेब्रवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, सैनिकी मुलांचे वसतिगृह, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक कर्नल मकरंद देशमुख (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शारीरिक प्रशिक्षण निदेशक (महिला) पदासाठी उमदेवार पदवी/ पदवीधर असावा. शारीरिक शिक्षणामध्ये पदवी व वसतिगृहात राहण्यास इच्छुक असल्यास प्राधान्य असणार आहे. अधिक माहितीसाठी मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या 9703548457 व 9421004794 या भ्रमणध्वनींवर संपर्क साधावा.
![]()

