पुढील 6 दिवस महत्वाचे, जोरदार पावसाचा इशारा, कधी कुठं पडणार पाऊस? जाणून घ्या सविस्तर…

मुंबई। दि. २७ सप्टेंबर २०२५: राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अशातच पुढील सहा दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत राज्यातील हवामान कसे असेल याबाबतची माहिती हवामान खात्याने दिली आहे. आजपासून दसऱ्यापर्यंत पुढील 6 दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील ‘या’ महत्वाच्या भागांत गुरुवारी (दि. ११ जून) वीजपुरवठा बंद राहणार…

संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून जोरदार पावसाची शक्यता:
आजपासून दसऱ्यापर्यंतच्या सहा दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रुपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे आज (शनिवारी 27 ला) सकाळ पर्यंत हवेच्या तीव्र कमी दाबात रुपांतराची व चंद्रपूर हिंगोली पैठण अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजे शनिवार दिनांक 27 सप्टेंबर पासुन दसऱ्यापर्यंतच्या 6 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

अतिजोरदार पावसाचे जिल्हे कोणते?
27 सप्टेंबर:
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये उद्या अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

28 सप्टेंबर: मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक छत्रपती संभाजीनगर व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा या जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

29 व 30 सप्टेंबर: मुंबई पालघर ठाणे रायगड व नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा या भागात देखील अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790