🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: फुल बाजारात युवकावर दगडाने हल्ला

नाशिक। दि. २९ ऑगस्ट २०२५: जेवण झाल्यानंतर फिरण्यास गेलेल्या तरुणावर अनोळखी इसमाने दगडाने हल्ला केल्याचा प्रकार आयुर्वेद महाविद्यालयाजवळ घडला. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि २० वर्षीय सुमित (रा. भद्रकाली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री ९ वाजता आयुर्वेद कॉलेज जवळ फुलबाजार गणेशवाडी येथे फिरत असताना अचानक एका अनोळखी व्यक्तीने पाठीमागून येत दगडाने हल्ला केला. यात सुमित हे जखमी झाले. संशयित दगड मारून पळून गेला. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790