नाशिक: अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी आई, सासू आणि पतीविरोधात गुन्हा दाखल

नाशिक। दि. २४ ऑगस्ट २०२५: अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणारी आई आणि पती, सासू, आजेसासू यांच्याविरोधात बाल विवाह अधिनियम आणि पोक्सो कायद्याअंतर्गत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

१६ मे २०२५ रोजी सिडको येथील एका मंगल कार्यालयात हा विवाह झाला होता. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने आणि पतीची आई, आजी यांनी मुलगी अल्पवयीन असताना लेखानगर येथील एका मंगल कार्यालयात लग्न लावून दिले. पतीने अल्पवयीन असताना शारीरिक संबंध ठेवले. मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बागुल करत आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790