🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: दुचाकी चोराला अटक; चार दुचाकी हस्तगत !

नाशिक। दि. २२ ऑगस्ट २०२५: पंचवटी तसेच शहरातीलविविध भागांतून दुचाकी चोरी करणाऱ्या सिडको कामटवाडे येथील दुचाकी चोराच्या पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

महेंद्र नंदकुमार कोळपकर असे संशयित दुचाकी चोराचे नाव आहे. पोलिस पथक हिरावाडी ते वज्रेश्वरी दरम्यान गस्त घालताना एक संशयित त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन लोटत जात असल्याने पोलिसांना संशय आला. त्याला थांबून चौकशी केली असता त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पंचवटी, भद्रकाली, तसेच सरकारवाडा हद्दीतून चार दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790