🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

तिसरा श्रावणी सोमवार: त्र्यंबकेश्वरला ३२ तास खासगी वाहनांना प्रवेश बंद

नाशिक। दि. १० ऑगस्ट २०२५: त्र्यंबकेश्वर परिसरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर, ब्रह्मगिरी पर्वतावर फेरीकरीता मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या वाहनांकरिता प्रवेश बंद करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

रविवारी (दि. १०) दुपारी १२ पासून ते सोमवारी (दि. ११) रात्री ८ वाजेपर्यंत त्र्यंबकमध्ये सर्वप्रकारच्या खासगी वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. नाशिककडून त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हारला जाणारी वाहतूक व जव्हारकडून त्र्यंबकेश्वरमार्गे नाशिककडे येणारी सर्वप्रकारची वाहतूक (एस.टी. बस वगळून) प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790