नाशिक: शेअर गुंतवणुकीचे आमिष दाखवून ७ लाखांचा गंडा घालणारा जेरबंद !

नाशिक। दि. २० जून २०२५: सेवानिवृत्ताला शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देत ७ लाखांची फसवणूक करुन ११ महिन्या पासून फरार असलेल्या शेअर्स ब्रोकरला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने वागळे इस्टेट, ठाणे येथे ही कारवाई केली. तेजस मधुकर कोळी असे या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी ३ जुलै २०२४ मध्ये अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: हॉटेल मॅनेजरचे अपहरण करून ५ लाख लुटणारे तिघे जेरबंद

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखा युनिट १ चे प्रशांत मरकड, यांना माहिती मिळाली शेअर्स मार्केटमध्ये फसवणूक करणारा संशयित ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याचा माग काढत सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. संशयिताच्या चौकशीत तो शेअर्स ब्रोकर असल्याचे समजले. अंबड परिसरात कार्तिकेयनगर, अंबड लिंकरोड येथे राहणारा असून तो शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देत फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790