🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: घरगुती सिलिंडरमधून अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग करणारे दोघे ताब्यात !

नाशिक। दि. १८ जून २०२५: घरगुती वापराच्या सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणारा अड्डा उध्वस्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडाळा रोडवर घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणा होत असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सावाना'त शनिवारी (दि. २१) ‘स्वर-सावाना’चे १९ वे पुष्प; गायिका आयेशा मुखर्जी यांचे सादरीकरण

संशयित सोपान अडांगळे (रा. भीमवाडी) व १ अल्पवयीन हा रिक्षात गॅस भरतांना मिळून आला. ४ घरगुती वापराचे सिलिंडर, इलेक्ट्रीकल मशिन, गॅस रेग्युलेटर, वजन काटा असा १ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790