नाशिक: भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

नाशिक। दि. १८ जून २०२५: पाथर्डीफाटा ते पाथर्डीगाव या रस्त्यावरून प्रवास करत असताना दुचाकीस्वाराला एका सुसाट वाहनाने धडक दिली. यात वृद्ध दुचाकीचालक प्रमोद वानखेडे (६६, रा. नरहरीनगर, पाथर्डी शिवार) यांचा मृत्यू झाला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: मंदिरांतील दानपेट्या फोडणाऱ्या तिघांना बेड्या !

रविवारी (दि.१५) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वानखेडे हे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या मोटारीने (एमएच १५ जीए ५७८६) त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी मोटारचालक संशयित सर्वज्ञ दातीर (२०) याच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात मयूर वानखेडे यांनी तक्रार दिली असून या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १९३/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790