नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यात आणखी चार दिवस पावसाचे

नाशिक, दि. १५ मे २०२५: गुरुवारी नाशिक, पुणे, सातारा, नगर, जिल्ह्यात मुसळधार वादळी पाऊस होणार असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस पावसाचे आहेत, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

बंगालच्या उपसागरात हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे बंगालच्या उपसागरकडून आर्द्रतायुक्त वारे राज्याकडे येत आहेत. गुजरात आणि कोकण व लगतच्या भागावर भागावरदेखील द्रोणीय स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाची स्थिती कायम आहे. २ ते ३ दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्रात दाखल होणार आहे, असेही सांगण्यात आले.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी मुलगा, सून आणि मुलीसह चौघांवर गुन्हा
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790