
नाशिक (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनानिमित्त सातपुर परिसरात श्रीराम भुमी मैदान, नाशिक, ता. जि. नाशिक या ठिकाणी गोदावरी महोत्सव विश्व हिंदू सेना अंतर्गत “होम मिनिस्टर” हा कार्यक्रम विनोद सोनवणे व काश्मिरा सोनवणे यांच्या मार्फत राबविण्यात आला तसेच महिलांच्या सुरक्षितेसाठी युद्ध कला, मर्दानी खेळ यांचे प्रात्यक्षिक सुरज भुसारी यांच्या “युनिक फिटनेस अॅकडमी” यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रम हा अॅड. महेंद्र माधवराव शिंदे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार सी. सीमाताई महेश हिरे व माजी महापौर दशरथ पाटील हे उपस्थित होते.
होम मिनिस्टर कार्यक्रमातील पैठणीचे मानकरी : पूर्वी रायते -प्रथम, वैभवी गांगुर्डे, अनिता उशीर, नीता माळी, मीना घोडके, किरण आव्हाड, शारदा खाटेकर, रूपाली ईघे, सूलोचना फापळे, साक्षी माळी, प्रियांका इमानदार.
सदरील कार्यक्रमात रामहरी संमेराव, भगवान काकड, दिपक आरोटे, सतिप घैसास, दत्ता पाटील, रविंद्र जोशी, भिमराव कडलग, उपाताई वेंडकोळी, संदिप काळे, संतोष शिरसाठ, अॅड. विशाल जाधव, कपिल आहिरे, प्रेम पाटील, धिरज खोळवे, आनंद पाटील, दत्ता ढोकळे, विशाल साळवे, नारायण जाधव, प्रविण पाटील, तुपार भंदुरे, निलेश जोशी, संदेश पाठक, भाऊसाहेव शिंदे, अक्षय लोंढे, अशोक जाधव, शरद काळे, प्रविण अहिरे यांनी मोलाची भुमिका बजावली.