नाशिक: सिक्युरिटी प्रेस, विभागीय आयुक्तालयासमोर अवजड वाहतुकीस प्रवेश बंद

नाशिक (प्रतिनिधी): विभागीय आयुक्त कार्यालय, इंडिया सिक्युरिटी प्रेस अति महत्त्वपूर्ण संरक्षित औद्योगिक विभाग म्हणून घोषित केला आहे.

अवजड वाहतुकीने अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता बुधवारपासून (दि. ५) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नाशिकरोड पोलिस ठाणे, नाशिकरोड न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, विभागीय आयुक्त कार्यालय, इंडिया सिक्युरिटी प्रेस, जय झुलेलाल मंदिर ते कन्या कोठारी शाळा टी पॉइंट या मार्गावर सर्वप्रकारच्या जड, अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट 'मकोका' लावणार; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आदेश
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790