नाशिक: कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या युवकास गुंडा विरोधी पथकाने केली अटक !

नाशिक (प्रतिनिधी): देवळाली गावातील सुंदरनगर भागात बेकायदा पिस्तूल बाळगणा-या तरूणाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यातून पिस्तूलसह जिवंत काडतुसे असा सुमारे ३२ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई गुंडा विरोधी पथकाने केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गेल्या ३ वर्षांपासून फरार असलेला घरफोडी प्रकरणातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जय उर्फ मारी वाल्मिक घोरपडे (२१ रा. सुंदरनगर, देवळाली गाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सुंदरनगर भागात एका तरुण कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि.१) पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पोलीसांची चाहूल लागताच त्याने रोकडोबावाडीच्या दिशेने धुम ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी पाठलाग करीत त्यास बेड्या ठोकल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नवीन घाटांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करावीत- पालक सचिव एकनाथ डवले

संशयिताच्या अंगझडतीत गावठी कट्यासह दोन जिवंत काडतुसे मिळून आले असून संशयितास मुद्देमालासह उपनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मनाई व शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक दिलीप सगळे,मलंग गुंजाळ,विजय सुर्यवंशी,सुनिल आडके,प्रदिप ठाकरे,गणेश भागवत,अक्षय गांगुर्डे,अशोक आघाव,सुनिता कवडे आदींच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790