नाशिक: सिटी लिंकचे ३ पास केंद्र आता रोज ८ तास खुले

नाशिक (प्रतिनिधी): सिटी लिंक बससेवेचे ३ पास केंद्र आता रविवार व अन्य शासकीय सुट्टीचे दिवस वगळता सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अर्थात ८ तास खुले राहणार आहेत.

सिटी लिंकसाठी ओपन एंडेड, सर्व्हिस, विद्यार्थी, दिव्यांग पास अशा वेगवेगळ्या प्रकारचे पासेस असून त्यासाठी सध्या सिटी लिंकचे मुख्य कार्यालय, निमाणी, नाशिकरोड अशा ३ ठिकाणी पास केंद्र सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या परीक्षा तसेच उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर सिटी लिंकच्या पास केंद्रांच्या वेळेत बदल करण्यात आलेले आहेत. सिटी लिंक मुख्य कार्यालय, निमाणी, नाशिकरोड हे तीनही पास केंद्र आता रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच सुरू राहतील. प्रत्येक रविवारी व शासकीय सुट्टीच्या दिवशी सदर पास केंद्र बंद राहणार आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'लोकल टू ग्लोबल'च्या माध्यमातून नाशिकला जागतिक निर्यात केंद्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790