नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पोलिस मित्र म्हणून वावरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराकडून नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने सात गुन्हे उघडकीस करून सुमारे साडेसोळा लाखाचे २८ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
सामनगाव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक संशयिताकडून १६ लाख रुपयांचे २८ तोळे मुद्देमाल जप्त एकूण ७ गुन्हे उघडकीस आणले आहे.
संशयित पप्पू ऊर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे (३८, रा. कैलास सोसायटी, जेल रोड) याच्या पोलिस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात वृध्द महिलेस मारहाण करण्यासाठी वापरलेले हत्यार वाहनांचे नट बोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पान्हा, मोटारसायकल जप्त केली आहे.
गांगुर्डे याने सात गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरलेले सोन्याचे दागिने विक्री केलेले सोनार यांचा शोध घेऊन २८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आला आहे.
सोने खरेदी करणारे सोनार, प्रशांत विष्णुपंत नागरे, हर्षल चंद्रकांत म्हसे, चेतन मधुकर चव्हाण या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन केली असता त्यांनी सोने घेतलेच माहिती दिली.
नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके, निरीक्षक पवन चौधरी, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णू गोसावी, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशराज पोतन, संतोष पिंगळे, भाऊसाहेब बागरे, कल्पेश जाधव, कोकाटे, सविन वाळूज, बोडके, रानडे, बच्चे आदींनी कामगिरी बजावली.
चार तासांत चोरटा अटकेत:
चोवीस तासातच सुभाष रोड येथे एका गोडाऊनमधून खताच्या गोण्या चोरी करणाऱ्या संशयितास अटक करून नऊ लाख ८३ हजार २९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जसबीर सिंग अमरीक सिंग (रा. आनंद निवास) यांच्या खताच्या गोण्यांची चोरी झाली होती. तपास गुन्हे शोध पथक करीत असताना अरुण गाडेकर यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आकाश रामचंद्र चिकणे (२९, रा. रमाबाई आंबेडकरनगर, गुलाबवाडी) यास ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव हे नाशिक रोड पोलिस ठाण्यात आले. उघडकीस आणलेले गुन्ह्याची माहिती घेऊन त्यांनी उपायुक्त राऊत, सहाय्यक आयुक्त डॉ. बारी, वरिष्ठ निरीक्षक शेळके व सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके आदींचे अभिनंदन केले.