नाशिक: तरुणीने लग्नास नकार दिल्याने 7 वाहनांची जाळपोळ

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): काठेगल्लीत दोघांकडून चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा सात वाहनांची जाळपोळ केली. परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न केला. वाहने जळून मोठे नुकसान झाले आहे. भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना ताब्यात घेतले आहे.

तरुणीशी ओळख असलेल्या संशयित सुमित पगारे (रा. धम्मनगर कथडा) याने तरुणीशी ओळख वाढवून संबंध प्रस्थापित करून विवाह करण्याची मागणी केली. तरुणीने त्यास नकार दिला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या १८ वर्षीय तरुणाला अटक

संशयिताने राग मनात धरून मंगळवार (ता.१४) संशयिताने त्याचा सहकारी मित्र संशयित विकी जावरे (रा. काठेगल्ली) याच्या मदतीने तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी चारचाकी आणि रिक्षाची जाळपोळ करून नुकसान केले.

सर्वप्रथम संशयीतांनी मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तरुणीचा भाऊ त्यांच्या अपार्टमेंटच्या बाहेर बसलेला असताना त्यास मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा त्याठिकाणी येऊन वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळपोळ केली. आरडा ओरड झाल्याने अपार्टमेंटच्या खाली येऊन पाहिले. वाहने जळत असल्याचे आढळून आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

स्थानिक रहिवाशांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बहुतांशी वाहने जळून राख झाली होती. यापूर्वीही संशयित पगारे याने तरुणांच्या दुचाकीची तोडफोड केली होती. घटनेनंतर अपार्टमेंटच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात दोघे संशयित आढळून आले.

तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भद्रकली गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात अवघ्या काही तासात दोघा संशयीतांना ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

घडलेल्या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सणासुदीत घटना घडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. संशयीतांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली. पोलीस अधिक तपास करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790