पंचवटी तपोवनात पिकअपची स्कुल व्हॅनला जोरदार धडक; 3 विद्यार्थी जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून आज शहरात पुन्हा एक नवीन अपघात घडला आहे. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला एका पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसून विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

जागोजागी होणारे हे अपघात चालकाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक नियम न पाळल्यामुळे, वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचे दिसून येते. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकच्या तपोवन भागातील स्कूल व्हॅनला पिकअप गाडीने जोरात धडक दिल्यामुळे स्कूल व्हॅनचा अपघात झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

व्हॅन मध्ये एकूण दहा ते बारा विद्यार्थी होते. सदर अपघातात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झालेले आहेत. वेळीच परिसरातील नागरिक धावून आल्याने विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सुखरूपपणे घरी पोहोचविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790