नाशिक: सातपूर येथे परप्रांतीय महिलेचा खून

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये गुन्हेगारी काही केल्या थांबण्याचं नाव नाहीये. आज सातपूर येथे एका परप्रांतीय महिलेचा खून झाल्याचं उघडकीस आलंय.

नाशिक मध्ये गुन्हेगारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. आज दिनांक 26 जुन रोजी दुपारच्या सुमारास सातपूर मध्ये परप्रांतीयांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नांदूर मध्यमेश्वरात ६,२१५ पक्ष्यांची नोंद; ११० सायकलस्वारांची पर्यावरण जनजागृती रॅली

विधाते गल्ली सातपूर या ठिकाणी सदर महिलेचा मृतदेह राहत्या घरात गळा कापलेल्या अवस्थेत मिळून आला.  याबाबतची खबर सातपूर पोलिसांना मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहे.

आत्महत्या की हत्या याबाबत चौकशीनंतरच निष्पन्न होण्याची शक्यता आहे. एक मुलगा एक मुलगी असून महिलेचा पती एका प्रायव्हेट कारखान्यात कामाला आहे . सदर कुटुंब हे परप्रांतीय असल्याचे समजत आहे. आजूबाजूच्या रूम मधील काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790