🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: महाकवी कालिदास कलामंदिरात फक्त मराठी नाटकांना 25 टक्के सवलत

नाशिक (प्रतिनिधी): मराठी नाटकांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने कालिदास कलामंदिरात फक्त मराठी नाटकांसाठी २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ही सवलत राहील.

शुक्रवारी (ता. २१) झालेल्या महासभेत सदर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. जागतिक मराठी नाट्यकर्मी निर्माता संघाचे सल्लागार प्रशांत दामले यांनी कालिदास कलामंदिरातील भाडे दरासंदर्भात निवेदन सादर केले होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील भाडे रकमेत ७५ टक्के सवलत देण्याच्या विनंती अर्जावर कारवाई करण्याचा सूचना दिल्या होत्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

त्या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. कोरोनाकाळात नाट्य व्यवसायाला मदत व्हावी तसेच चालना मिळावी म्हणून महापालिकेने ११ डिसेंबर २०२० ते ३० जून २०२२ पर्यंत दीड वर्षे ५० टक्के सवलत दिलेली होती.

१ जुलै २०२२ पासून पूर्ण भाडे आकारले जात आहे. भाडे दरात सवलत मिळण्यासाठी सादर झालेले निवेदन व कोविडमुळे मराठी नाट्य कलाकारांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी म्हणून कालिदास कलमंदिरामध्ये फक्त मराठी नाटकांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत २५ टक्के सवलत देण्यास महासभेने मंजुरी दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790