नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात कारची काच फोडून लॅपटॉप लंपास

नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात कारची काच फोडून लॅपटॉप लंपास

नाशिक (प्रतिनिधी): सिटीसेंटर मॉल जवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी परेश अनंत आंबेवाडीकर (रा.शिव कॉलनी,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; इंधनटंचाई नसल्याचा कंपन्यांचा खुलासा

आंबेवाडीकर बुधवारी (दि.१९) रात्री सीटी सेंटर मॉल भागात गेले होते. वाहन तळाच्या मोकळया जागेत त्यांनी आपली एर्टिगा कार पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या दरवाजाची काच फोडून मागील सिटावर ठेवलेली सुमारे २५ हजार रूपये किमतीचा लॅपटॉप असलेली बॅग चोरून नेली. अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790