NC

नाशिक: भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मायलेक जखमी

नाशिक: भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, मायलेक जखमी

नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील उत्तमनगर भागात भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील मायलेक जखमी झाले आहे.

शशिकांत श्रीराम अवसरकर (४० रा.विजयनगर,सिडको) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: विद्युत सुशोभीकरण व एलईडी कामांबाबत कुंभमेळा प्राधिकरणाची समन्वय बैठक

या अपघातात दुचाकीस्वार शशिकांत अवसरकर यांच्या डोक्यास गंभीर मार लागला.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्याच दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा स्वरूप (वय 9 ) हा खाली पडल्याने हाताला दुखापत झाली आहे. याबाबतची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांना कळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील वाहतुकीबाबत महत्वाची अपडेट.. जाणून घ्या सविस्तर…

चांदवडला देवीचं दर्शन झालं, मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं, चिमुकलीसह आईचा बुडून मृत्यू

या अपघातात स्वप्नाली अवसरकर (३८) व स्वरूप अवसरकर (९) हे मायलेक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक: कपडे वाळत घालायचं निमित्त झालं, सुखाचा संसार क्षणात मोडला

🔎 हे वाचलं का?:  मराठी भाषेत शिकूनच झालो सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश-निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई

अवसरकर कुटुंबिय शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अंबड लिंकरोडने अवसरकर कुटुंबिय बुरकुले हॉलच्या दिशेने जात असतांना बँक ऑफ इंडिया समोर पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ एचएच ६३४१ या मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीस धडक दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790