नाशिक। दि. १५ नोव्हेंबर २०२६: छट पूजेनिमित्त रामकुंड परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. रविवारी (दि. १५) दुपारी ३ ते सोमवारी (दि. १६) सकाळी १० वाजेपर्यंत रामकुंड परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
यंदा छट पूजेसाठी सुमारे ५० ते ६० हजार भाविक येण्याचा अंदाज आहे. या भागातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये आणि भाविकांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
हे मार्ग होणार बंद:
मालेगाव स्टॅण्ड, ढिकले वाचनालय, खांदवे सभागृह, सरदार चौक, गणेशवाडी आणि दिल्ली दरवाजा ते रोकडोबा मैदान या मार्गांवरून रामकुंडाकडे जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
पर्यायी मार्ग: वाहने गणेशवाडी- काटया मारूती पो. चौकी – निमाणी बसस्थानक – पंचवटी कारंजा यामार्गाने येतील व जातील.
भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी:
गौरी पटांगणात जाण्यासाठी मार्ग: मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, दिंडोरीना, सेवाकुंज, काट्या मारुती चौकी, देवी मंदिर, मुंजोबा चौक, आयुर्वेद हॉस्पिटल, मारी माता मंदिर.
शिंदे मळ्यात जाण्यासाठी मार्ग: मुंबई-आग्रा महामार्ग, ट्रॅक्टर हाऊस, नानावली पोलिस चौकी, अमरधाम पूल अथवा काट्या मारुती चौकी, देवी चौक, पंचवटी अमरधाम.
![]()


