नाशिक: चक्क टॉयलेटमध्ये लाच स्विकारताना अधिकाऱ्याला पकडले

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या आदिवासी विकास भवनात आणखी एक लाचखोर जाळ्यात अडकला आहे.

या अधिकाऱ्याने तर चक्क टॉयलेटमध्ये लाच स्वीकारली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून या अधिकाऱ्याला पकडले.

नाशिकमध्ये अधिकारी वर्गामध्ये सध्या काय चाललंय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच आदिवासी विकास विभागाचे मुख्यालयात एका एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुलला 28 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात 30 जूनपासून मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम

हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे.  प्रताप वडजे असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे.  वडजे हा आदिवासी विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत आहे.  रोजंदारीवरील पद स्वयंपाकी किंवा कामाठी करण्याच्या मोबदल्यात या वडजेने लाच मागितली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : सिंहस्थासाठी महावितरण सज्ज; चार नवीन उपकेंद्रांतून मिळणार अखंडित वीजपुरवठा

तक्रारदाराच्या पत्नीचे रोजंदारीवरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असे आदेश काढले होते. त्या कामाठी किवा स्वयंपाकी असं नव्याने आदेश बदलून  देण्याची विनंती केली होती. या कामाच्या मोबदल्यात  10 हजार रुपये लाचेची मागणी वडजे याने केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली.

🔎 हे वाचलं का?:  ‘स्वामी आहे उभा’ भक्तिगीत रसिकांच्या भेटीला; स्वामी समर्थांच्या भक्तीचा जागवला सुरेल आविष्कार

ठरल्यानुसार, 29 ऑगस्ट रोजी वडजे याने पैसे घेऊन बोलावले आणि टॉयलेटमध्ये त्याने 10 हजार स्विकारले. पण आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. वडजेला 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790